Monday, 4 August 2014

श्रीक्षेत्र पद्मालय ( Padmalaya )

श्रीक्षेत्र पद्मालय हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एरंडोल शहरापासून १० किमी अंतरावर असलेले धार्मिक स्थळ आहे. येथील गणपती मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

पद्मालय गणपती मंदिर

मंदिरालगत एक छोटासा तलाव आहे ज्यात अतिशय सुंदर कमळाची फुले फुललेली असतात. पद्मालय शब्दातील पदम म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे घर. म्हणून पद्मालय म्हणजे फुलांचे निवासस्थान.


भारतातील गणपतीच्या अडीच पिठांपैकी पद्मालय हे अर्धपीठ आहे. येथे गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत. त्यातील एक मूर्ती उजव्या सोंडेची तर दुसरी डाव्या सोंडेची आहे. दोन्ही मूर्त्यांना चांदीचे मुकुट आहेत. एकाच व्यासपीठावर दोन गणेश मूर्ती असलेले पद्मालयचे हे मंदिर एकमेव असल्याचे मानले जाते.


मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आत आणि बाहेर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या सभोवती लहान मंदिरे आहेत. गणपती मंदिराचा जीर्णोद्धार सद्गुरु श्री गोविंद महाराजांनी १९१२ साली केला आहे. श्री गोविंद महाराजांच्या पादुका मंदिराच्या समोर ठेवण्यात आल्या आहेत. मंदिरासमोर एक सभा मंडप आहे. त्यात ३ ते ४ फूट ऊंच भलीमोठी मूषकाची मूर्ती आहे.
पद्मालय हे प्रभाक्षेत्र म्हणुनही ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार याच ठिकाणी भीमाने बकासुराचा वध केला होता. गणपती मंदिरापासून १ ते २ किमी अंतरावर एक लहान तळे आहे ज्याला भीमकुंड म्हटले जाते. याच ठिकाणी बकासुर मारला गेला होता.

भीमकुंड 

No comments:

Post a Comment