Tuesday, 9 September 2014

भुईकोट किल्ला, पारोळा ( Parola Fort )

पारोळा येथील भुईकोट किल्ला १७२७ मध्ये बांधण्यात आलेला आहे. असे मानले जाते की हा किल्ला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा आहे, म्हणून पारोळा हे राणी लक्ष्मीबाईंचे माहेर मानले जाते.

भुईकोट किल्ला, पारोळा
किल्ल्याच्या सर्व बाजूंनी खंदक बनविलेले आहेत आणि पूर्वेकडील बाजूस एकविस्तीर्ण तलाव आहे. पावणे तीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या किल्ल्याची ऊंची ५२५ फूट आणि लांबी ४३५ फूट आहे. पारोळा शहराला ७ दरवाजे आहेत. मुख्य दरवाजाला दिल्ली दरवाजा जो किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूस आहे. अन्य दरवाजांना धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा,  इत्यादी नावे आहेत. 

No comments:

Post a Comment